जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोर आलेल्या मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर पोस्टर लावून शहरात विद्रुपीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील महापालिका इमारतील समोरील मुख्य रस्त्यावर राजेश भगवान राजवाणी (वय-४२) रा. आदर्श नगर, जळगाव याने बेकायदेशीररित्या पोस्टर लावून शहरातील विद्रुपीकरण केल्याचे समोर आले. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना माहित मिळाली. त्यानुसार मंगळवारी २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सुचना दिल्या. पोलीसां पथकाने कारवाई करत रस्त्यावर लावलेले पोस्टर काढून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी महापालिका कर्मचारी ईश्वर ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश भगवान राजवाणी रा. आदर्श नगर, जळगाव याच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय बडगुजर करीत आहे.