Home Cities जळगाव महापालिकेला लाभले नवीन दोन उपायुक्त

महापालिकेला लाभले नवीन दोन उपायुक्त

0
35

 

जळगाव, प्रतिनिधी । येथे महापालिकेत रिक्त असणाऱ्या उपायुक्त पदावर दिपक सावंत व शाम गोसावी यांना पदोन्नतीवर नियुक्त करण्यात आले आहे.

भिवंडी-निजामपूर महापालिकेचे सहायक आयुक्त दिपक सावंत यांची पदोन्नतीवर जळगाव महापालिकेत उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शाम गोसावी यांची देखील पदोन्नतीवर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक महिन्यापासून उपायुक्त पद रिक्त असल्याने प्रशासनावर कामाचा ताण वाढला होता. यात महापालिकेला नियमित उपायुक्त मिळाल्याने प्रशासकीय कामे व नागरिकांच्या समस्या सोडवण्यास गती प्राप्त होणार आहे.


Protected Content

Play sound