जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिकेत आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, लोकशाही दिनासाठी १५ दिवसापूर्वी तक्रार दाखल करणे आवश्यक असते. अशा प्राप्त २ तक्रारींचे संबधित विभागातर्फे निराकरण करण्यात आले.
आज सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी लोकशाही दिनी प्रत्यक्ष येवून अर्जदारांचे तक्रारी आयुक्त देविदास पवार यांनी प्रत्यक्ष ऐकून घेवून त्या पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडे प्रशासकीय अर्ज म्हणून पाठवण्यात आल्यात. आज आरोग्य विभाग व शहर अभियंता यांच्या विरोधात २, नगररचना विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या विरोधात १ तसेच नगररचना विभागाच्या विरोधात २ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहे. याप्रसंगी उपायुक्त चंद्रकांत वानखेडे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे, उदय पाटील, डॉ. विकास पाटील व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.