महापालिकेत भरली शाळा : विद्यार्थांनी महापौरांकडून जाणून घेतली मनपाची कार्यप्रणाली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महापौर जयश्रीताई महाजन यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी महापौरांनी महापालिकेच्या कार्यशैलीबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती देत त्यांच्या शंकांचे समाधान केले.

 

विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या कामकाजाबाबत विविध प्रश्न महापौर जयश्रीताई महाजन यांना विचारले. यात प्रामुख्याने  महापालिका स्थापन कधी झाली ? नगरसेवक किती असतात ? महापालिकेत महापौर कसे कामकाज करतात ? शासन दरबारी कशा पद्धतीने प्रस्ताव सादर केले जातात ? आदी  प्रश्न महापौरांना विचारले. यावेळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी महापालिकेची कार्यप्रणाली तसेच पदाधिकारी ,अधिकारी, कर्मचारी यांचे कर्तव्य याबाबत सखोल माहिती विद्यार्थ्यांना देवून त्यांच्या शंकांचे  समाधान केले. यावेळी काशिनाथ पलोड शाळेतील शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमाचे महापौरांनी कौतुक केले. आज महापालिकेत महापौर पदासोबतच शिक्षक पद अनुभवायला मिळाल्याचा आनंद झाल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

 

Protected Content