महापालिकेत आजादी का अमृतमहोत्सव अंतगर्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त शाम गोसावी आदी उपस्थित होते.

 

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी  शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोना काळात आपण सर्व घरात असताना सफाई कामगारांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. जळगाव शहरात स्वच्छता नसल्याचे मान्य करत महापौरांनी शहरात स्वच्छता ठेवण्याबाबत आवाहन केले. सर्वांच्या टीम वर्कने जळगाव शहर स्वच्छ व सुदंर राहू शकते असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले की, उपायुक्त शाम गोसावी यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार उत्कृष्ट काम होत आहे. नियोजनानुसार काम केल्यास शहरतील  अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागू तो पूर्णपणे संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली.  डेंग्यू व मलेरियाच्या आजारात वाढ होत असल्याने शहरात फवारणीची आवश्यकता असल्याचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी स्पष्ट केले. कोरोना काळात अमुल्य योगदान देणारे डॉक्टर, आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी, सामाजिक कार्य केलेल्या व्यक्ती, सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

महापौर-उपमहापौर यांचा सत्कार 

यावेळी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी स्वच्छतेबाबत केलेल्या अमुल्य असे कार्य केल्याने त्यांचा  देखील आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3123958934545236

 

Protected Content