जळगाव, प्रतिनिधी । शिवाजी नगरमध्ये महापौर भारतीताई सोनवणे यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी व सर्व भागात आज सॅनिटायझर फवारणी केली.
महापालिकेतर्फे शिवाजी नगर, हुडको व त्या समोरील दाळफड परिसर, डॉ शेखर पाटीलयांच्या दवाखान्यावळ, वेताळ बाबा गल्ली, उस्मानिया पार्क, भुरे मामलेदार प्लॉट या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. याप्रसांगी समाजसेवक भगवान सोनवणे, शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल, शिवाजी नगर अध्यक्ष निशांत काटकर, संतोष पवार, मसूद दादा, इम्रान खान,मोहन शेरा शकिल बागवान विजय राठोड, महापालकेच्यावतीने श्री गायकवाड उपस्थित होते.