जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेचा सन २०२०-२१ चा ७७९.६६ कोटींचा व २०२१-२२ चा ११६९.७० कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्याकडे सादर केला.
या अहवालावर स्थायी समितीने अभ्यास केल्यावर अंतिम मंजुरीसाठी महासभेत सादर करण्यात येणार आहे. स्थायी समितीने हा अर्थ संकल्प स्वीकारला असून अभ्यास करण्यासाठी सभा तहकूब करण्यात आली आहे. पुन्हा सभा होऊन त्यात स्थायी सदस्य काही सुधारणा सुचवणार आहेत. स्थायीच्या मान्यतेनंतर अंतिम मंजुरीसाठी हा अर्थसंकल्प महासभेसमोर सादर केला जाणार आहे.
आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने २०२०-२१ चा सुधारित तर २०२१-२२ चा मूळ शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला.
तपशील सन २०२१-२२चे मूळ अंदाजपत्रक (रकमा कोटीत)
आरंभीची शिल्लक २९८.४४
महसुली जमा ३६३.५४
भांडवली जमा ३९९.३६
परिवहन ०.०००१
पाणीपुरवठा ४५.५२
मलनिःसारण ६.७५
एकूण ११६९.७०
अखेर शिल्लक १०.४३
महसुली खर्च ४२३.५५
भांडवली खर्च ६०६.८८
असाधारण देवघेव ७६.३२
परिवहन ०.०३७
पाणीपुरवठा ४५.७४
मलनिःसारण ६.७५
एकूण ११६९.७०
——–
अर्थसंकल्प मनला भावणारा असला तरी प्रशासन कशाप्रकारे उद्दिष्ट गाठते याकडे पाहावे लागेल. तसेच या अर्थसंकल्पात रस्ता दुरुस्तीसाठी तोकडी तरतूद करण्यात आली आहे. मनपाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर प्रशासन व सत्ताधारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले. तसेच मागील दोन वर्षात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील किती उद्दिष्ट पूर्ण केले हे सत्ताधारी सांगावे असे आव्हान श्री. लढ्ढा यांनी दिले.
प्रशासनाने वास्तवादी अंदाजपत्रक दिले आहे. याचा अभ्यास करण्यासाठी सदस्यांना अंदाजपत्रक देण्यात आले आहे. यावर सदस्य अभ्यास करून त्यात काही दुरुस्ती असेल त्याबद्दल सूचना मांडतील व १५ दिवसात स्थायीची पुन्हा सभा बोलवून अंदाजपत्रकास मांजरी देण्यात येईल असे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी सांगिलते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/452371162881763