महापालिका करणार थकबाकीदारांवर नळ संयोजन खंडित करण्याची कारवाई

जळगाव, प्रतिनिधी । मागील कित्येक वर्षांपासून थकबाकी असेलेल्या मिळकतधारकांना वारंवार नोटीस बजावून देखील ते कोणताही प्रतिसाद देत नसल्याने अशा थकबाकीदारांवर नळ संयोजन खंडित करण्याचा निर्णय आजच्या स्थायी सभेत घेण्यात आला. 

मनपा स्थायी समितीची सभा सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने  घेण्यात आली. याप्रसंगी  व्यासपीठावर  आयुक्त सतीष कुलकर्णी, अप्पर आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. दरम्यान प्रभाग क्र. १ ते ४ मधील थकबाकीदार मिळकतधारकांकडील नळ संयोजन खंडित करण्यासाठी मक्तेदाराकडून २६ दिवस मजूर पुरविण्यात येणार्‍या ३ लाख ४० हजार ८० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.  तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी होणार्‍या ठिकाणी कारवाई करण्यासाठी  अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने आरोग्य विभागाकडील २० कर्मचारी दोन महिन्यांसाठी अतिक्रमण विभागाला देण्याबाबतचा निर्णय स्थायी समिती सभेत घेण्यात आला आहे. तसेच विषय पत्रिकेवरील नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.

 

Protected Content