Home Cities जळगाव महानगर राष्ट्रवादीची गांधिगिरी : भाजप कार्यालयात हजेरी देणार्‍यांचा सत्कार ! (व्हिडिओ)

महानगर राष्ट्रवादीची गांधिगिरी : भाजप कार्यालयात हजेरी देणार्‍यांचा सत्कार ! (व्हिडिओ)

0
38

 

 

जळगाव राहूल शिरसाळे । काल महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी चक्क भाजपच्या कार्यालयातील बैठकीला हजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले आहे. यावरून आज महानगर राष्ट्रवादीने गांधिगिरी करत भाजप कार्यालयातील बैठकीत जाऊन माहिती देणार्‍यांचा सत्कार केला.

भाजप कार्यालयात हजेरी लावणारे अधिकारी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेल्या स्थायी समितीच्या सभेत हजर होते. या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी महानगर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह युवक महानगर अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे, युवक महानगर सरचिटणीस जयेश पाटील व गणेश निंबाळकर यांनी थेट महापालिका गाठली. त्यांनी सभा संपल्यावर सभागृहाच्या दारातच त्या अधिकाऱ्यांना अडवत भाजपचा गमछा गळ्यात घालून सत्कार केला. यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील ‘आपण आता भाजपचे अधिकृत सदस्य झाला असल्याचा टोला लगवत गांधीगिर करत भाजपचा गमछा घालून त्यांचा सत्कार केला.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/2447280622084912

 


Protected Content

Play sound