जामनेर प्रतिनिधी । पुण्यातुन महानगरातून येणाऱ्या बसेसची जामनेर आगारात वेगळी व्यवस्था करा, अशा सुचना तहसिलदार अरूण शेवाळे यांनी जामनेर येथील कोरोनाच्या धर्तीवर मंगळवार ता.१७ रोजी घेतलेल्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.
कोरोनाचा प्रभाव वाढूनये म्हणून शासनाकडून मोठ्याप्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरीही वाढणारी रूग्णांची संख्या चिंतेचा विषय अाहे. अशातच पुण्या मुंबईसह महानगराकडून गावाकडे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याबाबत आगाप्रमुखांकडून आढावा घेतला असता गेल्या चार दिवसांपासून पुण्याहून सर्वाधीक प्रवासी जामनेरकडे येत असल्याचे सांगीतले. तर पुण्यासह अन्य महानगरातून येणाऱ्या वाहनांची पार्कींग वेगळी करा. बस स्थानकावरच आवश्यक त्या सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात याव्या. गावागावात फवारणी करा, जंतूनाशक पावडर टाका. पिण्याच्या पाण्याची काळजी घ्या, पाण्यात टीसीएल टाका. अशा सुचना यावेळी तहिसलदार शेवाळे यांनी दिल्या. तर जामनेर उपजिल्हा रूग्णालयात सॅनेटायझार नाही, पुरेसे मास्क उपलब्ध नसल्याची माहती डाॅ.चांदा यांनी दिली. यावेळी जामनेर पोलिस ठाण्याचे पाेलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे, जामनेर पालिकेचे मुख्याधिकारी राहूल पाटील यांचेसह तालुक्यावरील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.
ट्रॅव्हल्सची प्रचंड भाडेवाढ
पुण्यात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता पुण्याचे शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आल्या आहेत. तर विद्याथ्र्यांसाठी चालवील्या जाणाऱ्या मेस, काही हॉटेल्सही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावाकडे येणाऱ्यांची संख्या पहाता बसेसचे तिकीट उपलब्ध होत नाही. तर टॅव्हल्सचालकांनी तीकीट २००० ते २५०० रूपयांपर्यंत केले आहे. त्यामुळे मी खाजगी गाडी करून बहिणीला आणण्यासाठी पुण्याला जावे लागत आहे.
– अॅड.महेंद्र पाटील, जामनेर.