महात्मा फुले हायस्कूलमध्ये सन-१९९६ बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात

dharangaon 5

 

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील स्थानिय महात्मा फुले हायस्कूलमध्ये तब्बल २४ वर्षानंतर (सन-१९९६) बॅचचे स्नेह संमेलन मेळावाचे आयोजन आज (दि.१८ जानेवारी) रोजी करण्यात आले होते.

सन -१९९६ बॅचचा विद्यार्थी महेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेचे माजी जेष्ठ शिक्षक बी.ए. पाटील अध्यक्षस्थानी होते. व प्रमुख अतिथी जी.टी. महाजन (माजी शिक्षक), एस.डब्ल्यु.पाटील (माजी मुख्याध्यापक), आर.डी.महाजन (माजी मुख्याध्यापक), पी.आर.माळी (माजी शिक्षक), पी.के. रोकडे (माजी शिक्षक) व महात्मा फुले हायस्कूलचे सर्व माजी शिक्षक उपस्थितीत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता- तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर महेंद्र पाटील यांनी माजी- आजी शिक्षकांचा परिचय करून दिला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाल-सन्मानचिन्ह-पुष्पगुच्छ भेट स्वरूपात देण्यात आले. यानंतर शाळेच्या वतीने या सर्व माजी विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांचे शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा, सावित्रीमाईंची भाषणे असे ३० ग्रंथ भेट देण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक एस.डब्ल्यू.पाटील, प्रभारी मुख्याध्यापक एस.आर.महाजन यांनी मनोगत व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.ए.पाटील यांनी माजी विद्यार्थ्याच्या या स्नेहमेळाव्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तर महेंद्र पाटील तर आभार छाया माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व १९९६ बॅचचे सर्व विद्‌यार्थ्यांनी सहकार्य केले.

Protected Content