धरणगाव (वृत्तसंस्था) धरणगांव शहरातील ‘सुवर्णमहोत्सवी शाळा’ महात्मा फुले हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदाचा पदभार शनिवारी पुष्पा रविंद्र सोनवणे यांनी स्वीकारला.
दि. ३१ मे ,२०२० रोजी शाळेचे माजी मुख्याध्यापक एस.आर. महाजन प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाले. आता १ जुन , २०२० पासून धरणगाव येथील स्नुषा व डॉ. रविंद्र तुकाराम सोनवणे यांच्या धर्मपत्नी पुष्पा सोनवणे यांनी मुख्याध्यापकपदाचा पदभार स्विकारला. शाळेतील जेष्ठ शिक्षीका एम.के. कापडणे, व्ही.पी. महाले, जे.एस.पवार यांनी विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले यांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या पर्यवेक्षकपदी जे.एस.पवार यांची नियुक्ती झाली. हेमंत माळी, व्ही.टी.माळी व पी.डी.पाटील यांनी जे.एस.पवार सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधु – भगिनी, कर्मचारी वृंद यांनी मुख्याध्यापिका व पर्यवेक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुवर्णमहोत्सवी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापकपदी माझी नियुक्ती झाली हे माझे परम भाग्यच आहे. मी सावित्री माईची लेक या पदाला मी नक्की न्याय देईल ,असे प्रतिपादन पी.आर. सोनवणे मॅडम यांनी केले.