धरणगाव (प्रतिनिधी) महात्मा फुले हायस्कूचा माजी विद्यार्थी तथा एरंडोल येथील संचालक सदगुरू मेडीकल आणि जनरल स्टोअर्सचा संचालक नितीन कैलास महाजन याने वाढदिवसानिमित्त माळी समाज मढीसमोरील अण्णाभाऊ साठे नगरातील २० कुटुंबांना अन्नधान्याचे कीटचे नुकतेच वितरण केले.
काही दिवसा पूर्वी नितीन त्याच्या मित्राच्या घरी अण्णाभाऊ साठे नगर येथे गेला होता. सहज विचारलं काय चाललं मित्रा ?….. मित्र म्हटला , अरे यार ! या कोरोना महामारी मुळे खायचे वांदे झाले आहेत. नितीन निशब्ध झाला. ४ मे रोजी नितीनचा वाढदिवस होता. नितीनने आई – वडीलांसमोर मित्राचे दुःख मांडले. सर्वांनी ठरविले खरचं कोरोना महामारीमुळे जग हैरान आहे. म्हणून मग नितीनने अण्णाभाऊ साठे नगरातील २० कुटुंबांना अन्नधान्याच्या कीटचे नुकतेच वितरण केले. वडील कैलास महाजन ( मोठा माळीवाडा ) व आई उषाबाई महाजन यांनी देखील तात्काळ होकार दिल्यामुळे नितीनने घरच्या – घरी ( गहु – तांदुळ – तेल – डेटॉल साबण – भाजीपाला ) असे २० कीट तयार केले. त्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने २० कीटचे वितरण केले. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचा आदर्श व सावित्रीमाईंनी प्लेग महामारिच्या वेळेस केलेल्या जनसेवेच्या कार्यातूनच आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे नितीनने नम्रपणे नमूद केले. शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर या महापुरूषांचा वारसा जपत नितीनने माणुसकी जपत अनोख्या सामाजिक बांधिलकी जपत नितीन महाजनने वाढदिवस साजरा केला. यावेळी जयेश महाजन , शुभम महाजन , सागर महाजन , अतुल महाजन , निवृत्ती महाजन , मंगेश माळी , गौरव माळी हे सोबत होते. मागच्या वर्षी देखील नितीनने परीसरातील शाळकरी मुलांना २० सामान्य ज्ञानाचे पुस्तकांचे वाटप केले होते. या उपक्रमाचे परीसरात नितीन व त्याच्या परीवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.