धरणगाव (प्रतिनीधी) येथील माळी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा धरणगावच्या माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांची महात्मा फुले ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
उषाताई वाघ या पाच वर्षे नगराध्यक्षा होत्या, तेंव्हा त्यांनी विविध विकासाची कामे केली होती. तसेच समाजाचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.उषाताई वाघ यांनी मातोश्री बहुउद्देशीय संस्थेमार्फत विवीध उपक्रम राबवणे, महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उचलला आहे. त्यांच्या याच सामाजिक कामाची दखल घेऊन महात्मा फुले ब्रिग्रेडचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांनी एका पत्रान्वये जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेविका सुरेखा विजय महाजन, धरणगाव माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, महात्मा फुले बिग्रेडचे तालुका अध्यक्ष नरेंद्र महाजन व शिवसेना नगरसेविका कल्पना विलास महाजन, सुरेखा विजय महाजन, अंजलीताई विसावे, आराधना नंदलाल पाटील, मंदाताई जितेंद्र धनगर, किर्ती किरण मराठे, पार्वताबाई पाटील, महिला आघाडी शहर प्रमुख रत्नाताई धनगर यांनी सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देवुन अभिनंदन केले आहे.