जळगाव, प्रतिनिधी । पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य तेल, खते, इंधन, कृषी उपयोगी कीटकनाशके व जीवनावश्यक औषधी दरवाढी विरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकार आपल्या अखत्यारीत असलेल्या पेट्रोल डिझेलचे भाव रोज वाढवत आहे. त्याचप्रमाणे,गॅस, खाद्य तेल, मटन, साखर. आदी चे दरही वाढत आहेत. शेतक-यांचे गरजेचे रासायनिक खते, बी बियाणे औषधी यांच्या दरवाढी सुरूच आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये कामाची कागदपत्र त्यासाठी प्रतिज्ञा पत्रे आदी फी वाढतच आहे. दुसरीकडे शेतमजूर, कष्टकरी यांचे मजुरी दरात वाढ नाही. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना राज्य व केंद्र सरकारने बासनात गुंडाळून ठेवलेली आहे.. शेतमजुरांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण भरपूर आहे. या मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे पांगवण्यासाठी राम मंदिर पाकिस्तान चीन हिंदू- मुस्लीम असले मुद्दे पुढे करून जनतेमध्ये तेढ निर्माण करीत आहे सरकारला विनंती की आपण कबूल केलेले अच्छे दिन आजनितीस सर्व वस्तूंचे दर वाढवून मिश्किल अर्थाने बोलवायचे झाल्यास केंद्र सरकार काय असले “अच्छे दिन?” लादत आसेल जनतेला हे नको व २०१४ पूर्वीचे बुरे दिन द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी कॉ. अमृत महाजन, कॉ. लक्ष्मण शिंदे, जिल्हा सचिव शांताराम पाटील, गोरख वानखेडे, छोटू पाटील, हिराबाई सोनवणे वासुदेव कोळी, धोंडू पाटील,बळीराम ढीवर, यमुनाबाई धनगर, प्रमिलाबाई धनगर, मंगला कुमावत, लताबाई धनगर, देवकाबाई धनगर, रंजनाबाई धनगर, बापू कोळी आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/525919008750040