जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना जाहिर आवाहन करण्यात येते की, महाईस्कॉल प्रणालीवरील सन 2011-12 ते 2016-17 या कालावधीतील शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी व इतर योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांची तसेच सन 2017-18 मध्ये प्रथम वर्ष प्रवेशीत शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी व इतर योजनासाठी पात्र विद्यार्थ्यांची त्यांना देय रक्कम बँकेमार्फत विद्यार्थी व महाविद्यालय यांच्या बँक खात्यात ईसीएसव्दारे वर्ग करण्याकरीता सहाय्य्क आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांच्या बँक खात्यामधून वर्ग करण्यात येत आहे.
काही तांत्रिक अडचणीमुळे (आयएफसी कोड, खाते क्रमांक चुकल्यामुळे) महाविद्यालय व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर संबंधीत कालावधीतील रक्कमा जमा झालेल्या नसल्यास, आपल्या स्तरावर योग्य ती खातरजमा करण्यात यावी. एखाद्या कालावधीमधील काही रक्कमा जमा झाल्या नसल्यास या कार्यालयास बँक खात्याचे अद्यावत स्टेटमेंट घेवून 20 मे, 2020 पर्यंत संपर्क साधावा. तसेच अखर्चित रक्कमा शासन खाती 31 मे, 2020 अखेर भरणा करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.