महसूल मंत्री थोरातांच्या राजीनाम्याची मागणी : जळगाव जिल्हा जागृत जनमंच उपोषण करणार

 

जळगाव,प्रतिनिधी । महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे भ्रष्ट्राचाराच्या तक्रार करून देखील कारवाई न केल्याने त्यांचा राजीनामा मागण्यासाठी जळगाव जिल्हा जागृत मंचतर्फे सोमवार २६ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील महसूल खात्यातील भ्रष्ट्राचाराबाब दीपककुमार गुप्ता व विजय दोधा पाटील यांनी पोस्टाद्वारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत शिवराम पाटील व डॉ. सरोज पाटील यांनी संगमनेर येथे जाऊन तक्रारी दाखल केल्या आहेत. यावर महसूल मंत्री थोरात यांनी कोणतीही कारवाई न करता उलट भरष्ट्राचाराला सरंक्षण दिला असल्याचा आरोप जळगाव जिल्हा जागृत मंचतर्फे करण्यात येऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी सोमवार २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

Protected Content