भुसावळ : प्रतिनिधी । महसूल खात्याने जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांनी दण्ड न भरल्याने अशा ३ वाहनांचा २४ ऑगस्टरोजी तहसीलदार कार्यालयात लिलाव केला जाणार आहे
भुसावळ तालुक्यात अनाधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन जप्त करुन तहसिल कार्यालय येथे लावण्यात आलेली आहेत. वाहन मालक यांना दंडात्मक नोटिस व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु वाहन मालक यांनी दंडाचा भरणा केलेला नसल्याने जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजुन लिलाव करुन महसुल शासनास जमा केला जाणार आहे
अटकावून ठेवलेल्या वाहनाचे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांचेकडुन मल्यांकन झाले आहे. मुल्यांकनानुसार
उपविभागीय अधिकारी यांचेकडुन मंजुरी प्राप्त झालेली आहे. या वाहनांचा तहसिल कार्यालय भुसावळ येथे २४ ऑगस्टरोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास जाहीर लिलाव करण्यात येईल. ट्रक ( MH 19J9666 ) , ट्रक व डंपर ( MH26B4789 व MH 19FJ2171 ) असे या वाहनांचे वर्णन आहे
लिलावाच्या अटी व शर्ती याकरीता तहसिलदार यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. .लिलावात भाग घेण्याची निविदा अर्जाचे शुल्क रुपये ५०००/- . प्रत्येक वाहनांसाठी अर्जाचे शुल्क वेगवेगळे भरावे लागेल. लिलावात भाग घेणा-या व्यक्तीना हातची किंमतीच्या पुढे बोली लावायची आहे. लिलावधारकास त्याने बोली केलेल्या रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम ताबडतोब भरणे बंधनकारक असेल अशी माहिती तहसीलदार दीपक धीवरे यांनी दिली .