रावेर, प्रतिनिधी | येथील महसूल विभागाकडून गौण-खनिजची ९४ टक्के वसूली झाली असून विविध टॉवरचे १०० टक्के वसूली झाल्याची माहिती नायब तहसिलदार संजय तायडे यांनी दिली आहे.
मार्चअखेर जवळ येत असून महसूल विभाग उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये तालुक्यातील जिओ कंपनीच्या २७ टॉवर जिटीएल कंपनीचे नऊ टॉवर तर इंडीस कंपनीचे ३३ टॉवर असे एकूण ६९ टॉवरचे ३५ लाख ५० हजार यांची १०० टक्के वसूली करण्यात आली आहे. गौण-खनिजाचे सुमारे दोन कोटी ३४ लाख असे ९४ टक्के वसूल करण्यात आले आहेत.