महत्वाची बातमी : ‘या’ कारणामुळे विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलल्या !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी गुरूवार २ फेब्रुवारी पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. दीपक दलाल यांनी गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्धिपत्रकांवर कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाकडे असलेल्या प्रलंबित व विविध मागण्यांसाठी गुरूवार २ फेब्रुवारीपासून सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यापीठाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षा आयोजनास अडचणी येत असल्यामुळे विविध महाविद्यालयांना याबाबत सूचना देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाद्वारा घेण्यात येणाऱ्या ३ फेब्रुवारी पासून पुढे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. विद्यापीठाच्या परिक्षा घेण्याबाबत विद्यापीठाकडून कळविण्यात येणार आहे. याबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, प्राचार्य आणि शिक्षक यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. दीपक दलाल यांनी बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दिलेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content