जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सुप्रिम कॉलनीतून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला बुलढाणा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गणेश ज्ञानदेव नेहते (वय-३३) रा. खुपचंद नगर, सुप्रिम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश नेहते याच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस ठाण्यात ७ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा रजीष्टर नंबर ९५/२०२२ नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेव्हापासून गणेश नेहते हा पोलीसांचा चकवा देवून फरार झालेला होता. दरम्यान, संशयित आरोपी हा राहत्या घरी सुप्रिम कॉलनीत आला असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत संशयित आरोपी गणेश ज्ञानदेव नेहते यांला अटक केली. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक किशोर पाटील, पोलीस नाईक योगेश बारी, पोकॉ मुकेश पाटील, पो.कॉ. किरण पाटील यांनी केली. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपी गणेश नेहते याला मलकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद चोपडे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.