आळंदी । कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच पार पाडावा असे निर्देश सरकारने दिले आहेत.
आळंदीचा कार्तिकी वारी सोहळा कसा साजरा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन सोहळ्याला परवानगी देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी उशिरा याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. यात, केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच हा सोहळा साजरा करण्याची अट घातली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा यावर्षी ७२५ वा संजीवन समाधी सोहळा आहे. हा सोहळा दि. ६ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.