मुंबई प्रतिनिधी । काल विधानपरिषदेत संमत करण्यात आलेले मराठी भाषा सक्तीचे विधेयक आज विधानसभेतही मंजूर करण्यात आले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आज विधान भवनात इये मराठीचिये नगरी…नावानं मराठी गौरव सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्तानं विधान भवनाच्या आवारात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यानंतर अधिवेशन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस करणारा ठराव विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आला. तसेच मराठी भाषा सक्तीचे विधेयक मंजूर करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीचा कायदा होणं हे माझं भाग्यच आहे.