जळगाव, प्रतिनिधी । कार्यकर्त्यांनी आजच्या प्रशिक्षण वर्गातून मरगळ झटकून नवीन उत्साहाने पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले. आज एमआयडीसी परिसरातील आयोजित प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत विषयांवर मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातुन तळागाळातील लोकांना घरपोच मदत दिली आहे. तरुण, महीला उद्योजक आर्थिक सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातुन नवीन संकल्पना राबविल्या आहेत. या सर्व घटकांना न्याय देणाऱ्या योजनेतून ज्यांना ज्यांना लाभ मिळाला आणि ज्यांना मिळाला नसेल त्यांच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रशिक्षण वर्गातून कार्यकर्त्यांना नवी उभारी मिळणार आहे. कार्यकर्त्यांनी आजच्या प्रशिक्षण वर्गातून मरगळ झटकून नवीन उत्साहाने पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.
आज एमआयडीसी परिसरातील आयोजित अयोध्या नगर क्र. ३, झुलेलाल नगर मंडल क्र.७ तसेच मेहरूण क्र.८ या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात खासदार उन्मेश पाटील यांनी आत्मनिर्भर भारत विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर नगरसेविका रंजना वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप रोटे, जिल्हा सरचिटणीस नितिन इंगळे उपस्थित होते. याप्रसंगी अयोध्या नगर क्र. ३ चे अध्यक्ष प्रवीण कोल्हे, झुलेलाल नगर मंडल क्र.७ संयोजक विकी सोनार, मेहरूण क्र.८ चे अध्यक्ष विनोद मराठे तसेच कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.