चोपडा प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील ग्रामपंचायतीचे शिपाई कोरोना काळात फवारणीचे काम करत असतांना आजारी पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताच्या वारसास ५० हजार रूपयांचा विमाचा लाभ द्यावा अशी मागणी काँम्रेड अमृत महाजन यांनी केली आहे.
धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील ग्रामपंचायतीचे शिपाई रविंद्र साहेबराव पाटील हे २४ जुलै रोजी दुपारी बारा वाजता कर्तव्यावर असतांना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, कुटुंबियांनी त्यांनी सोनवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने वैद्यकिय अधिकारी यांनी जळगाव जिल्हा रूग्णालयात रवाना केले. दरम्यान त्यांचा रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मयत रविंद्र पाटील हे कष्टाने गावात पाणीपुरवठा ग्रामस्वच्छता तसेच कोरोना साथ काळात फवारणीचे काम करत होते तसेच बाहेरून गावात येणारे यांची माहिती ती देण्याचे काम करत होते. तेव्हा त्या कोरोना योध्यांचे परिवारास महाराष्ट्र शासनाने विमा कवच अंतर्गत ५० लाख रुपये देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव अमृत महाजन यांनी केली आहे.