जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मन्यारखेडा येथील एकाच्या घरातून रोकडसह दोन मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, इम्रान शरीफ खान (वय-३६) रा. फातेमा नगर मन्यारखेडा ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ३१ मे रोजीच्या मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून रोकड आणि दोन मोबाईल असा एकुण २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी इम्रान खान यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.