मनूर खुर्द येथील देशी व गावठी दारू विक्रीवर कडक कारवाई करा ; सरपंच स्वाती हडपे यांची मागणी

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील मनूर खुर्द येथे देशी दारू व गावठी दारूची खुलेआम विक्री केली जात असून यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनूर खुर्दच्या सरपंच स्वाती हडपे व ग्रामपंचायत सदस्य यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

मनूर खुर्द येथे देशी दारू व गावठी दारूची खुलेआम विक्री केली जात असून यावर कडक कारवाई करून या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे.  निवेदन मनूर खुर्दच्या सरपंच स्वाती अमोल हडपे, उपसरपंच गणेश भगवान सोनवणे, ग्राम पंचायत सदस्या इंदुबाई दशरथ धनगर, गीता श्रीकृष्ण धनगर सरला शांताराम वांगेकर, शोभाबई शांताराम गावंडे ,पोलीस पाटील नितीन विश्वनाथ पाटील तुषार दशरथ सोनवणे, अमृत गोमाजी हडपे, माणिक शाळीग्राम बोरसे,नामदेव शिवराम धनगर,पांडुरंग निनू धनगर, आणि अविनाश ( मुन्ना) श्यामसुंदर पाटील आदींनी बोदवडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ,यांना दिले आहे, हा प्रकार एकट्या मनूर खुर्दमध्ये नसून बोदवड तालुक्यातील चार पाच गावे वगळली तर सर्व गावात देशी दारू,गावठी दारू,इंग्लिश दारू,सह खुलेआम धाब्यावर सुद्धा विकली जाते. मनूर खुर्द गावातील अवैध दारू विक्री बाबत कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे,

Protected Content