मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञात इसमांनी हल्ला केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे सध्या सुखरुप आहेत. त्यांना थोडा मार लागला आहे. त्यांनी उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

संदीप देशपांडे हे मनसेचे फायरब्रँड नेते असून अनेक मोठ्या नेत्यांवर खोचक टिका करण्यासाठी ते ख्यात आहेत. ते आपल्या पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडतांनाच प्रखर टिखा करण्यासाठी प्रसिध्द आहेत. यामुळे त्यांचा हल्ला हा राजकीय वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Protected Content