मनसेचे ठिय्या आंदोलन; श्री दत्त मंदीर पाडण्यास विरोध (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शास्त्री टॉवर चौकाजवळील रस्त्यावर असलेल्या श्री दत्त मंदिर हटविण्याच्या कारवाईला विरोध करत मनसेने ठिय्या आंदोलन केले व महापालिकेच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शास्त्री चौक जवळ एका झाडाच्या खाली छोटेसे श्री दत्त मंदिर आहे. दरम्यान हे श्री दत्त मंदिर पाडण्याच्या कारवाईसाठी मंगळवारी २ ऑगस्ट रोजी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आले होते. त्यावेळी श्री दत्त मंदिर तोडण्याच्या तयारीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तोडण्यास विरोध करत ठिय्या आंदोलन केले. मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे जळगाव जिल्हा संघटक राजेंद्र निकम जळगाव जिल्हा उपसंघटक ललित शर्मा यावल तालुका संघटक विकास पाथरे जळगाव जिल्हा सचिव योगेश पाटील जळगाव तालुका संघटक महेंद्र सपकाळे जळगाव शहर उपसंघटक विशाल कुमावत व  पदाधिकाऱ्यांनी श्री दत्त मंदिर पाडण्याऱ्या महापालिकेच्या अतिक्रण निर्मुलन पथकास तीव्र विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. श्री दत्त मंदिर पाडल्यास रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी संतप्त मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला दिला आहे.

 

दरम्यान, मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन आपली भूमिका मांडली. यावर आयुक्तांनी  रस्त्याचे काम करतांना आवश्यकता असल्यास मंदीर हटविण्यात येईल अन्यथा मंदीर हटविण्यात येणार नसल्याचे सांगत मंदीर हटविण्याची कारवाई तात्पुरती थांबिण्यात आली असल्याचे मनसे पदाधिकाऱ्याना सपष्ट केले. यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले.

भाग १

भाग २

Protected Content