Home Cities जळगाव मनपात लोकशाही दिनी १४ तक्रारी दाखल

मनपात लोकशाही दिनी १४ तक्रारी दाखल

0
34


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिकेत आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, लोकशाही दिनासाठी १५ दिवसापूर्वी तक्रार दाखल करणे आवश्यक असते. अशा प्राप्त ५ ही ताक्ररांची संबधित विभागातर्फे निराकरण करण्यात आले. तर आज १४ तक्रारदारांनी प्रत्यक्ष येवून वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी सादर केल्यात.

 

आज सोमवार दि. ६ जून रोजी लोकशाही दिनी प्रत्यक्ष येवून अर्जदारांचे तक्रारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रत्यक्ष ऐकून घेवून त्या पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडे प्रशासकीय अर्ज म्हणून पाठवण्यात आल्यात. याप्रसंगी उपायुक्त प्रशांत पाटील, शहर अभियंता नरेंद्र जावळे ,पाणीपुरवठा अभियंता संजय नेमाडे, विद्युत अभियंता एस. एस. पाटील , प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, उपायुक्त चंद्रकांत वानखेडे, सहाय्यक आयुक्त श्री. गोराणे व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.


Protected Content

Play sound