जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलनातील थकबाकीदारकांचे गाळे सील करण्याची कारवाई पुन्हा हाती घेण्यात आली आहे. आज भोईटे मार्केट मधील सर्वच्या सर्व २४ गाळे मनपा प्रशासनाने सील केले आहेत. या कारवाईमुळे थकबाकीदार गाळेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भोईटे मार्केट मधील संपूर्ण गाळे सील करण्यात आले आहेत. ही कारवाई महसूल उपायुक्त प्रशांत पाटील, अतिक्रमण विभाग उपायुक्त श्याम गोसावी, किरकोळ वसुली अधीक्षक नरेंद्र चौधरी, संजय ठाकूर, गौरव सपकाळे, सुकदेव बाविस्कर, संजय दाभाडे, राजू शिंदे, किशोर सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. गाळे सील करण्याची कारवाई दुपारी १२ वाजता सुरु करण्यात आली. वेळोवेळीबा थकबाकी भरण्यासंदर्भात आवाहन करून देखील भोईटे मार्केट मधील गाळेधारकांनी ती न भरल्याने आज संपूर्ण मार्केटच सील करण्यात आले. भोईटे मार्केट मधील गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. मात्र, भोईटे मार्केटमधील एकही गाळेधारकांने ही थकबाकी अंतिम मुदतीपर्यंत न भरल्याने आज संपूर्ण मार्केट सील करण्यात आले आहे. जवळपास २.५ कोटींची थकबाकी या गाळेधारकांकडे थकीत होती. संपूर्ण मार्केट सील करण्याची कारवाई महापालिकेकडून प्रथमच करण्यात आली असल्याने गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/532334561330083
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/369962144544953