मध्य प्रदेश: बहुमत चाचणी उद्यावर ढकलली !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कमलनाथ सरकारला बहुमत चाचणीसाठी निर्देश देण्यात यावे, अशी याचिका सुप्रीम कोर्टात भाजपने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने उद्यापर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

 

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर उद्या सकाळी साडे दहा वाजता सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, राज्यपाल लालजी टंडन यांनी सरकारला पत्र लिहून मंगळवारी विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, आता कोर्टाच्या निर्णयानंतर ही चाचणी उद्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील बंडखोर काँग्रेस आमदारांनी बंगळूरूत २२ आमदारांनी पत्रकार परिषद घेत कमलनाथ सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

Protected Content