Home राजकीय मध्य प्रदेशात भाजपची सरकार बनणार नाही : कमलनाथ

मध्य प्रदेशात भाजपची सरकार बनणार नाही : कमलनाथ


भोपाल (वृत्तसंस्था) भाजप जवळ बहुमत नसून भाजपची सरकारही बनणार नाही. परंतू आताच्या घडीला शिवराज सिंह चौहान यांची मुख्यंमंत्री बनण्याची धडपड मात्र, संपूर्ण देश बघत असल्याची टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज काही ट्वीट केले आहेत. त्यातील एका ट्वीटमध्ये कमलनाथ यांनी म्हटलेय की, भाजप जवळ बहुमत नसून भाजपची सरकारही बनणार नाही. शिवराज सिंह चौहान यांना अजून विधायक दलचा नेता म्हणूनही निवडण्यात आलेले नाही. परंतू आताच्या घडीला शिवराज सिंह चौहान यांची मुख्यंमंत्री बनण्याची धडपड मात्र, संपूर्ण देश बघत आहे. तसेच याआधी केलेल्या एका अन्य ट्वीटमध्ये कमलनाथ यांनी त्यांना दिवसा देखील मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत आहेत. अधिकाऱ्यांना धमकावले जात आहे. त्याच्या या स्थितीवर मला दया येतेय. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या कर्नाटकातील अटकेचा निषेध केला आहे.


Protected Content

Play sound