जळगाव, प्रतिनिधी | शहरातील टेलिफोन नगर येथील रहिवासी ज्येष्ठ साहित्यिक मधुकर रामदास नेवे यांचं वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने काळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले नातवंडे सूना असा परिवार आहे उद्या सोमवारी सकाळी 9.00 वाजता टेलिफोन नगर येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्यायात्रा काढण्यात येणार आहे,नेरी नाका स्मशान भूमीत कोरोनाच्या नियमांचे पालन करत अंत्य संस्कार केले जाणार आहेत. अप्पा नेवे ,विनय नेवे, एबीपी माझाचे चंद्रशेखर नेवे, शुभदा नेवे यांचे ते वडील होते.तर पद्मजा चंद्रशेखर नेवे यांचे ते सासरे होते.
मधुकर नेवे यांचे निधन
3 years ago
No Comments