मद्यधुंद भावांची शेजारी कुटुंबाला मारहाण

 

 चाळीसगाव: प्रतिनिधी । मद्यपान करून घरासमोरील महिलेला शिवीगाळ करत मध्यस्थी मध्यस्थी करणाऱ्या तिच्या घरच्यांना  लोखंडी पाईपने त्यांना  जबर मारहाण केल्याची  घटना ओझर येथे घडली याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

संजय मोरे ( २५ रा. ओझर) कुटुंबासह वास्तव्यास आहे. ते  व त्यांचे  भाऊ विनोद मोरे हे हातमजुरी करतात. त्यांच्या घरासमोर दिलीप जाधव व किसन  जाधव कुटुंबासह राहायला आहे.  २३ फेब्रुवारीरोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास  दिलीप जाधव व किसन जाधव या दोघांनी मद्यधुंद होऊन संजय मोरे यांच्या घरातील महिलांना शिवीगाळ  केली कामावरून संजय मोरे व विनोद मोरे घरी परतल्यावर वाद सुरू होता. संजय मोरे समजवायला गेला असता. दिलीप जाधव व किसन जाधव यांची मुले प्रदिप जाधव व प्रविण जाधव यांनी त्याला उजव्या हाताला व पाठीवर लाकडी दांडक्याने व संदीप जाधव यांनी  कुर्हाडीने कपाळावर वार करून जबर मारहाण केली.

 

शेजारी वास्तव्यास असलेला मावसा गौतम बोराळे यांनी  मध्यस्थी केली असता संदीप जाधव व प्रविण जाधव यांनी लोखंडी रॉडने त्यांनाही  मारहाण केली. गौतम बोराळे व संजय मोरे यांना शिंदे हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. संजय मोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड  व  सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले हे पुढील तपास  करीत आहेत.

Protected Content