Home आरोग्य मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण !

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण !


मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनीच तशी माहिती दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला आयसोलेट करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी” अशी विनंती देखील अस्लम शेख यांनी केली. “मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे, असेही अस्लम शेख यांनी सांगितले. दरम्यान, शेख यांची प्रकृती ठिक असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.


Protected Content

Play sound