फैजपूर, प्रतिनिधी |भारतीय लोकशाहीची अतिशय उज्वल परंपरा असून आपण मतदार आहोत ही गर्वाची बाब आहे. मतदार वाढीस हातभार लावल्यास मतदान वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी केले. ते १० व्या राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे होते. यावेळी व्यासपीठावर जळगाव मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे, तडवी, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, अजीत मुठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. तुकाराम हुलवडे, परदेशी , धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. पाटील पुढे म्हणाले की, महाविद्यलयांमध्ये नवतदारांची मतदार नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यात मुलींचेही मतदार नोंदणी तितकीच आवश्यक आहे तसेच मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले. मतदार वाढीसाठी बीएलओ म्हणून शिक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडत आहे. तसेच शिक्षकांवर विश्वास असल्याने शिक्षकांना बीएलओची कामे सोपविली जात असे डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. निवडणूका पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे पार पडली याचे त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. दरम्यान यावेळी नवमतदार विद्यार्थ्यांना मतदार कार्ड वितरण करण्यात आले. तसेच उत्कृष्ट बीएलाओ म्हणून कार्य करणाऱ्या बीएलओचा, मतदार नोंदणीमध्ये सहभाग घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा तसेच महाविद्यालय स्तरावर कॉलेज अंबीसीडर, नोडल ऑफिसर, सामाजिक संस्था, रावेर, यावल मंडळ अधिकारी मंडळाचे तसेच मतदार वाढीसाठी विविध महाविद्यलयांमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पत्रकार वासुदेव सरोदे, दिलीप वैद्य, शेखर पाटील या तीन पत्रकारांचा प्राथमिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले. आभार रावेर तहसीलदा उषाराणी देवगुण यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा. लेफ्टन राजेंद्र राजपूत व जे. डी. बंगाळे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, सर्कल फैजपूर जे. डी. बंगाळे यांच्यासोबत प्रशासन व महसुलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.