मटेरियल पुरविण्यासाठी सूट द्या ; व्यापारी असोसिएशनची मागणी

भुसावळ, प्रतिनिधी । येथील बिल्डिंग मटेरियल व्यापारी असोसिएशनतर्फे परवानगीधारक कन्ट्रक्शन साईट्सटला (खाजगी,सरकारी) यांना मर्यादित वेळेच्या आत मटेरियल देण्यासाठी सूट मिळावी अशी मागणी प्रांत याना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

भुसावळ बिल्डिंग मटेरियल व्यापारी असोसिएशनच्या सभासदांनी या लॉकडाऊन काळात आपआपल्या परीने शक्य तेवढी समाजाला मदत व सेवा कार्य केले व करत आहेत. या व्यतिरिक्त लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. आज लॉकडाउन ४.० च्या शिथीलतेत महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी उद्योग, धंद्यांना सोशल डिस्टन्सिंग व कोव्हीड १९ च्या प्रोटोकॉल प्रमाणे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भुसावळचा विचार करता मध्य रेल्वे, ऑर्डिनन्स फॅक्टरी भुसावळ व वरणगाव, औष्णिक वीजनिर्मिती केंद्र दीपनगर , न्हाई तसेच शासकीय ठिकाणी बांधकाम कामे सुरू करण्यासाठी सूट परवानगी देण्यात आली आहे. हयाच प्रमाणे परवानगीधारक कन्ट्रक्शन साईट्सट(खाजगी, सरकारी) यांना मर्यादित वेळेच्या आत मटेरियल देण्यासाठी सूट मिळवी. बिल्डिंग मटेरियल व्यवसायात बहुतांश वेळी या ऑर्डर्स फोनद्वारे दिल्या जातात त्यामुळे इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या तुलनेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन पुर्णपणे केले जाते. भुसावळमध्ये अंदाजे फक्त ३०-३५ बिल्डिंग मटेरियल विक्रेते आहेत. मात्र या विक्रेत्यांवर जवळपास १५० ते २०० स्थानिक कुटुंब अवलंबून आहेत. आज ह्या कुटुंबांना गेले २ महिने काही काम नाही व त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. म्हणूनच त्यांना नितांत गरज आहे. तसेच ही सर्व आस्थापने कोणत्याही कॉम्प्लेक्समध्ये नाही. सर्व हे स्टॅन्डअलोन असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. निवेदनावर कमलजीत सिंह गुजराल ( प्रिंसी सेठ), विकास पचपाण्डे, पंडित भीरुड, संजय काळे, मनोज आगहिचा, सतीश उगले, पवन चव्हाण, दीपक पाटिल आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Protected Content