रावेर, प्रतिनिधी । रावेरला उद्दीष्ट संपल्याने मका खरेदी बंद करण्यात आले आहे. मात्र, आजही शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असल्याने मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली.
रावेर मका खरेदी केंद्रावर आतापर्यंत १२३ शेतक-यांची १ कोटी २ लाख ३४ हजार २०० रूपयांचा ५ हजार ५३२ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. तर ज्वारी व मका विक्रीसाठी ११७० शेतक-यांनी नंबर लावला होता. तब्बल ९६२ शेतकरी बाकी असतांना शासनाने उर्फाटा निर्णय घेत खरेदी बंद केले आहे. आधीच भर दिवाळीत खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतक-यांमध्ये नाराजी होती.त्यातच ११७० शेतक-यांनी मका व ज्वारी विक्रीसाठी नाव नोंदले होते. त्यापैकी फक्त १२३ शेतक-यांचाच मका खरेदी होऊ शकला आहे. तर सुमारे ९६२ शेतकरी अजुन खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत.