मंदिरावर हल्ल्यानंतर बांगला देशात हिंसाचार

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यावरुन परत येताच बांग्लादेशात  हिंसाचार उसळल्याचं पाहायला मिळत आहे. बांग्लादेशात एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला त्यानंतर   संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहे.

 

एका कट्टरपंथी मुस्लीम संघटनेच्या शेकडो सदस्यांनी पूर्व बांग्लादेशमधील हिंदू मंदिरांवर आणि एका रेल्वेवर हल्ला केली. पंतप्रधान मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्याविरोधात या मुस्लीम संघटनेनं हा हिंसाचार घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत 10 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचंही कळतंय.

 

बांग्लादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यावर गेले होते. आपल्या बांग्लादेश यात्रेत पंतप्रधान मोदी यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे जवळपास 1.2 मिलियन कोरोना व्हॅक्सिन सोपवल्या. मोदींनी आपल्या दौऱ्यात बांग्लादेशकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यासह भारत आणि बांग्लादेशात 5 महत्वाचे करारही झाले आहेत.

 

पंतप्रधान मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर तिथल्या इस्लामिक संघटनांनी मोदींवर भारतीय मुस्लिमांप्रती भेदभावाचा आरोप केला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये शुक्रवारी झालेल्या आंदोलनादरम्यान शेकडो लोक जखमी झाले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबराच्या गोळ्याही चालवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कट्टरपंथी मुस्लीम संघटनांनी चटगांव आणि ढाका इथं रस्त्यावर आंदोलन केलं होतं.

Protected Content