Home क्राईम मंत्री गिरीश महाजन यांचे AI-निर्मित बनावट फोटो सोशल मीडियावर प्रसारित; जळगाव सायबर...

मंत्री गिरीश महाजन यांचे AI-निर्मित बनावट फोटो सोशल मीडियावर प्रसारित; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट AI-निर्मित (AI Generated) तसेच मॉर्फ केलेले फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूरासह हे फोटो प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा क्रमांक १७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ३५६, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) मधील कलम ६६(C), ६७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, एका फेसबुक खात्याच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले किंवा मॉर्फ केलेले फोटो प्रसारित करण्यात आले. या फोटोसोबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर जोडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जळगाव सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित प्रकरणाची नोंद केली आहे. सोशल मीडियावर बनावट फोटो, व्हिडिओ किंवा दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करून व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संबंधित सोशल मीडिया खातेधारकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  दरम्यान, वाढत्या डिजिटल माध्यमांच्या वापरासोबत AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली जात असून, नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound