मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर आता खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाला असून आता ही यादी राज्यपालांकडून मंजूरीसाठी राजभवनात पाठविण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतून बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्यात आली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. गेल्या ४० दिवसांपासून सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणे बाकी होते. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच मंत्रीमंडळातील एकुण १८ आमदारांची मंत्रीमंडळाची शपथ घेतली आहे. यात शिंदे गटाचे ९ तर भाजपचे ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटपाविषयी चर्चा सुरू होते. अखेर आज मंत्री मंडळाच्या खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजभवनात पाठविण्यात आली असून लवकर यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
शिंदे गटातील मंत्री
तानाजी सावंत
उदय सामंत
संदीपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील
============
भाजपकडून मंत्री
गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा