रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळ्याची कसून चौकशीला सुरू आहे. याप्रकरणात गटविकास अधिकारी यांचा देखील सहभाग आहे की नाही याची चौकशी केली जात आहे. त्यांचा सहभाग असल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिली आहे.
रावेर पोलीस ठाण्याच्या आवारात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे हे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर पंचायत समिती शौचालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये आतापर्यंत शासकीय कर्मचारी आणि लाभार्थी असे एकुण २४ जणांना संशयित म्हणून अटक केली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होता. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी रावेर पोलीस ठाण्यात शांतता कमिटी बैठकीला हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांनी अनेक प्रश्न पोलीसांसमोर उपस्थित केले. दरम्यान अनुदान वर्ग करणाऱ्या चेकवर जॉईन स्वाक्षरी लागणारे लेखाधिकारी अटकेत असतांना गटविकास अधिकारी यांना अभय का ? सवाल उपस्थित केला. यावर पोलीस अधिक्षक म्हणाले की, भ्रष्टाचार प्रकरणात गटविकास अधिकारी यांचा सहभाग तपासला जात आहे. या त्यांचा काही सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर देखील निश्चित कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सांगितले.