भोलेनाथ पेट्रोल पंपावर सिनेस्टाईल मारहाण ; ३५ हजारांच्या रोकडची लुट

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी  । गाडीमध्ये पेट्रोल कमी भरले म्हणून पेट्रोल पंपावर सिनेस्टाईल मारहाण करीत ३५ हजारांची रोकड लुटून नेण्यात आली. याप्रकरणात घोडसगाव येथील दहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आहे.  

मुक्ताईनगर तालुक्यातील मुंबई नागपूर हायवे वरील घोडसगाव नजीक असलेल्या भोलेनाथ पेट्रोल पंपावरील कामावर असलेल्या नोकराकडून गाडीमध्ये पेट्रोल कमी भरले त्या कारणावरून मारहाण करत ३५ हजाराचा ऐवज लुटल्या प्रकरणी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  घोडसगाव जवळील भोलेनाथ पेट्रोल पंपाजवळ बाजूला असलेल्या ढाब्यावर अर्जुन  सांगळकर , राज ठाकरे, गणेश सांगोलकर व इतर सात ते आठ जणांनी पंपावर एक गाडीमध्ये कमी पेट्रोल टाकले याकारणावरून सोमवार दि. १ मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाद घातला. या वादातून त्यांनी पेट्रोल पंपावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या जवळील पेट्रोल विक्रीतून आलेले ३४  हजार १९० रुपये त्याला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देऊन काढून घेलते. याप्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर पाटील यांच्या सांगण्यावरून या तिघांसह इतर सात ते आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार संजय पाटील करीत आहे.

Protected Content