पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वरखेडी भोकरी युवक काँग्रेस शाखेचे उद्घाटन युवक काँग्रेस जिल्हाअध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.

युवक काँग्रेस शाखेचे उद्घाटन प्रसंगी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, माजी नगरसेवक नंदकुमार सोनार, पाचारोऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष मुक्तार शहा, पंचायत समिती उपसभापती रशीद काकर, विधानसभा युथ काँग्रेसचे अध्यक्ष शेख शकील शेख इब्राहिम, भोकरी गावचे सरपंच मौलाना अरमान, माजी सरपंच शकील सुलेमान, मा. सरपंच इरफान भिकारी शफिक, आधार हमीद सुलेमान, पाचोरा तालुका युवक अध्यक्ष राऊत कहाकर, डॉ. अशपाक हे उपस्थित होते. यावेळी देवेंद्र मराठे, अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार यांनी युवक काँग्रेस व काँग्रेसच्या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लोकमान भाई यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शफी काकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. भोकरी युवक काँग्रेस अध्यक्षपदी असलम कयूम काकर, उपाध्यक्षपदी मुश्ताक गफूर काकर, सचिवपदी सलीम सहित काकर, सल्लागारपदी खलील सुलेमान काकर, सरचिटणीस अरबाज इब्राहिम यांची निवड करण्यात आली.


