जळगाव, प्रतिनिधी । शहरातील भोईटेनगर रेल्वे गेट जवळ थोडादेखील पाऊस आला तर तलावाचे रूप येते. आज पंधरा मिनिटे पाऊस पडल्यावर या परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून वाहतूक करावी लागली.
शहरातून खोटे नगर, पिंप्रळा व शिवाजीनगर परिसरातील नागरिक जळगाव शहरात येण्यासाठी भोईटे नगर रेल्वे गेटचा वापर करीत असतात. त्यांना पावसाचे पाणी तुंबलेल्या रस्त्यातून मार्गक्रमण करतांना कसरत करावी लागते. यात दुर्दैवाने अपघात होऊन एखाद्याला आपल्या जीवास मुकावे लागू शकते. मनपा प्रशासन हा रस्ता दुरुस्त करत नसल्याने पावसाचे पाणी तुंबत आहे. नागरिकांची ही समस्या महापालिकेने त्वरित सोडवावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कॉंग्रेस सेवादलाचे गोकुळ चव्हाण यांनी दिला आहे. रिक्षाचालकांनी रस्त्यात पाणी साचत असून यातून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/185077293563595