भुसावळ प्रतिनिधी । भारत सरकार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन केले जात आहे. याचा फायदा भुसावळ वाहतूक शाखा घेऊन राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने थांबून चालकांची कोरोना विषाणूचा बहाणा दाखवत मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्याचे काम सुरू आहे.
सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावाच्या भीती पोटी जनता बाहेर फिरण्यासाठी टाळत असलेली दिसत आहे.पण ट्रक चालकांच या उलट आहे. ते बाहेर गावावरून येत असल्याने कोरीना विषाणूंचा प्रादुर्भाव त्यांना असल्याचा शक्यता नाकारता येत नाही. यासाठी भुसावळ वाहतूक शाखा वाहन चालकांना थांबवून त्यांची तपासणी करीत आहे. मात्र त्याच्या नावाखाली दाबून वसुली केली जात आहे.