भुसावळ प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनानिमित्त रेल्वे विभागातर्फे सकाळी रेल्वे प्रबंधक विवेक गुप्त यांच्याहस्ते रेल्वेच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आरपीएफ कर्मचाऱ्यांनी झेंडाला वंदन करुन सलामी दिली. रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी परेडचे निरिक्षण केले. महाप्रबधंक यांचा संदेश वाचून दाखविला अणि त्यानंतर आरपीएफ कर्मचार्यानी परेड ला सुरवात करण्यात आली.
नंतर रेलवे स्कूल विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम अणि देश भक्तिवर गीत लोकनाट्य सादर करण्यात आले. याप्रसंगी अपर मंडल रेल्वेप्रबंधक मनोज सिन्हा, आरपीएफ आयुक्त क्षितिज गुरव, वरिष्ट मंडल कार्मिक अधिकारी न डी गांगुर्डे, वरिष्ट मंडल परिचालनप्रबंधक स्वप्निल नीला, मंडल वाणिज्य प्रबंधक बी. अरुण कुमार, वरिष्ट मंडल विद्युत अभियंता जी.के.लखेरा, वरिष्ट मंडल दुरसंचार, सिंगनल अभियंता निशांत द्रिवेदी, वरिष्ट मंडल अभियंता (समनव्य) राजेश चिखले, वरिष्ट मंडल संरक्षा अधिकारी एन. के. अग्रवाल, वरिष्ट मंडल विद्युत अभियंता पी.के.भंज, वरिष्ट मंडल विद्युत अभियंता प्रदीप ओक, सर्व अधिकारी उपस्थित होते. कर्मचारी वर्ग, स्काउट गाइड विद्यार्थी, तसेच रेलवे स्कूल चे विद्यार्थी उपस्थित होते.