भुसावळ रनर्सच्या महिला रनच्या प्रशिक्षणाला प्रारंभ

bhusawal 3

भुसावळ प्रतिनिधी । येथील भुसावळ स्पोर्टस आणि रनर्स असोसिशन आयोजित ‘बी सारा लेडीज ईकव्यालिटी रनच्या स्पर्धकांसाठी प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. नवोदित महिला धावपटू शशिकला लाहोटी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून विधिवत प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी समन्वयिका डॉ. निलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, प्रा.प्रविण फालक, सचिन अग्रवाल, सीमा पाटील, ब्रिजेश लाहोटी, सचिन मनवानी, नितिन पाटील, प्रवीण वारके, रणजीत खरारे, प्रवीण पाटील उपस्थित होते. प्रथम महिला धावपटूंना वॉर्मअपचे महत्व सांगण्यात आले. त्यानंतर सर्वांनी वॉर्म अपला सुरुवात केली. त्यानंतर या नवोदित महिला धावपटूंना धावण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.धावण्याचे अंतर, वेग, श्वासोच्छवास आदी गोष्टीत लक्ष देऊन हळू हळू धावायला सुरुवात झाली. यावेळी नविन धावपटूंचा उत्साह व आनंद वाखाणण्या जोगा होता. धावल्यानंतर योगशिक्षीका पूनम भंगाळे यांनी उपस्थित महिलांना स्ट्रेचिंगचे वेगवेगळे प्रकार शिकविले. अनेक वर्षांनी आपण भुसावळ रनर्सच्या सदस्यांसोबत सहज धावु शकलो व ही अतिशय आत्मविश्वास निर्माण करणारी गोष्ट आहे, असे अनेक महिलांनी बोलून दाखविले.

या प्रशिक्षणाला सरोज शुक्ला, पूनम कुलकर्णी, चारुलता अजय पाटील, कंगना मनवाणी, कांचन पाटील, स्वाती फालक, ज्याेस्ना पाटील, ममता ठाकूर, वेदश्री फालक, निशा गुमनानी, पूजा मोहनानी, क्रीपा मूलचंदानी, मयुरी आहुजा, यशोधरा शिरसाठ, भारती राठी, ज्योती पाटील, मीना नेरकर, चंचल भोळे आदी महिलांनी सहभाग नोंदविला.

Protected Content