भुसावळ, प्रतिनिधी । राजू भाऊ प्रभागाच्या सुशोभीकरण्याच्या दृष्टीने जे काम करत आहे अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे व लवकरचे रिंग रोड लगत उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण व राजू भाऊंनी सांगितल्या प्रमाणे विकास कामाचं उद्याटन करण्यात येईल असे प्रतिपादन आ. संजय सावकारे यांनी केले. ते नगर पालिका विकास फण्डातुन आज प्रभाग क्रंमाक १३ मध्ये विकास कामांचा प्रारंभ करतांना बोलत होते.
नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी सांगितले की, त्याच प्रमाणे प्रभाग क्र १३ चा सुशोभीकरण्याच्या दृष्टीकोनातुन येणाऱ्या काळात गडकरी नगर व सरस्वती नगर येथे सुरु असलेल्या बगीचाचे लोकार्पण व मुख्य रस्त्याचे डांबरीकरणचे भूमीपूजन करण्यात येईल व त्याच प्रमाणे प्रहलाद नगर येथे भव्य असे बोटनिकल गार्डन बनविन्यत येणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक राजू नाटकर, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेविका मंगला आवटे, किशोर टोके, शिव कैथवास, रवी लेकुरवाळे, विशाल महाजन , लाजरस मनी, गौरव आवटे, राजेश चंदन आदी उपस्थित होते.